नव्या आघाडीचे नेतृत्व मुलायमसिंह करणार 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

लखनौ :सामाजिक न्यायासाठी 'समाजवादी धर्मनिरपेक्ष मोर्चा' या नव्या आघाडीची मी स्थापना करणार असून, ज्येष्ठ बंधू मुलायमसिंह यादव हे त्याचे प्रमुख असतील, अशी घोषणा आज समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादव यांनी आज येथे केली. 

समाजवादी पक्षाची धुरा मुलायमंसिहाकडे न दिल्यास नव्या आघाडीची स्थापना करण्याचा इशारा त्यांनी नुकताच अखिलेश यादव यांना दिला होता. आज इटावा येथे पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ''समाजवादी धर्मनिरपेक्ष मोर्चा'चे मुलायमसिंह यादव राष्ट्रीय अध्यक्ष असतील.'' 

इटावा येथे एका नातेवाइकाच्या घरी आज सकाळी मुलायमसिंह यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. ही नवी आघाडी समाजवादी पक्षाच्या विरोधात निवडणुका लढविणार का? किंवा सर्व समाजवाद्यांना एका छताखाली आणणार का, याबाबत यादव यांनी काही खुलासा केला नाही. 

''अखिलेश यादव यांनी पक्षाची सूत्रे मुलायमसिंहाकडे देण्याचे वचन दिले होते. त्यांनी आता तसे करावे. मी अखिलेश यांना तीन महिन्यांचा अवधी देतो; अन्यथा आपण नव्या धर्मनिरपेक्ष आघाडीची स्थापना करू,'' असे शिवपाल यादव यांनी बुधवारी म्हटले होते. उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवपाल व अखिलेश या काका पुतण्यातील वाद विकोपाला गेला होता. घरातील 'यादवी'मुळेच पराभव पत्करावा लागल्याचा आरोप पक्षातील अनेकांनी केला होता. 

स्वतः मुलायमसिंह यांनी पराभवासाठी पुत्र अखिलेश यांना जबाबदार धरले होते. ''माझ्या मुलाने माझा अपमान केला. जो मुलगा आपल्या वडिलांशी एकनिष्ठ नसतो, तो कोणाशीही एकनिष्ट राहू शकत नाही, हे मतदारांना समजले आहे,'' असे वक्तव्य त्यांनी नुकतेच केले होते.