मुंबईत एक कोटी 40 लाखाच्या नव्या नोटा जप्त

वृत्तसंस्था
शनिवार, 17 डिसेंबर 2016

मुंबई : अंधेरीतील एका मोटारीतून शुक्रवारी रात्री उशिरा दोन हजार रुपयांच्या एक कोटी 40 लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

मुंबई : अंधेरीतील एका मोटारीतून शुक्रवारी रात्री उशिरा दोन हजार रुपयांच्या एक कोटी 40 लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिस उपायुक्त आणि मुंबई पोलिसांचे प्रवक्ते यांनी याबाबत माहिती दिली आहे. अंधेरीतील जुहू-वर्सोवा लिंक रस्त्यावर शुक्रवारी रात्री पोलिसांची तपासणी सुरू होती. यावेळी पोलिसांना एका मोटारीत दोन हजार रुपयांच्या एक कोटी 40 लाख रुपये किंमतीच्या नोटा आढळून आल्या. यावेळी मोटारीत चार जण होते. या नोटांसह पोलिसांनी या चारही जणांना ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी गुरुवारी चेंबूर येथे केलेल्या कारवाईत दहा कोटी दहा लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चलनातून बाद झालेल्या नोटांचा समावेश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या. त्यामुळे काळा पैसा धारकांनी साठवलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी किंवा बॅंकेत जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्राप्तीकर विभागासह पोलिस ठिकठिकाणी तपास करत असून बेकायदेशीरपणे बाळगण्यात येणाऱ्या जुन्या आणि नव्या नोटा जप्त करण्यात येत आहेत.

देश

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा होत असतानाच १५ ऑगस्ट रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

बंगळूर : विरोधी पक्षांवर खोटे गुन्हे दाखल करीत लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा (एसीबी...

रविवार, 20 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. एका...

रविवार, 20 ऑगस्ट 2017