वाद सोडविण्यात मुस्लिम संघटनांकडून अडथळे : स्वामी

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

"रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद सोडविण्यात मुस्लिम संघटना अडथळे आणत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज केला. न्यायालयात हा वाद सोडविण्याची अंतिम मुदत एप्रिल 2018 पर्यंत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली - "रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद सोडविण्यात मुस्लिम संघटना अडथळे आणत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आज केला. न्यायालयात हा वाद सोडविण्याची अंतिम मुदत एप्रिल 2018 पर्यंत असल्याचेही त्यांनी सांगितले.

अयोध्याप्रश्‍नी न्यायालयाबाहेर चर्चेने तोडगा काढावा, असे सर्वोच्य न्यायालयाने काल सुचविले आहे. त्या पार्श्‍वभूमवीर स्वामी म्हणाले, ""न्यायालयाबाहेर चर्चेने तोडगा काढणे म्हणजे वेळ वाया घालविण्यासारखे आहे. सर्वोच्य न्यायालयातच यावर सुनावणी व्हावी, अशी प्रतिक्रिया काल सर्व मुस्लिम संघटनांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. एकप्रकारे हे नेते यामध्ये वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहेत. सर्वोच्य न्यायालयात हा खटला गेल्या साडेसहा वर्षांपासून पडून आहे. त्यावर एकही सुनावणी झालेली नाही.''

ते म्हणाले, ""एकतर यावर सर्वोच्य न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या मध्यस्थीने यावर तोडगा काढावा लागेल किंवा दररोज होणाऱ्या सुनावणीतून तोडगा काढाला लागेल. मुस्लिम संघटनांनी हा खटला प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न केला तरी याची अंतिम मुदत एप्रिल 2018 ही आहे.'' विश्‍व हिंदू परिषदेने मंदिरबांधणीच्या मदतीसाठी कायदा करण्याची मागणी केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपला राज्यसभेत बहुमत मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राममंदिर बांधण्याबाबतचा कायदा संसदेत संमत करण्याचा मार्ग भाजपसाठी मोकळा होणार आहे.'

Web Title: Muslim organizations have making trouble in solving Rammandir issue : Swami