'राममंदिर उभारावे ही मुस्लिमांची इच्छा'; 'युपी'त पोस्टरबाजी

Muslim organizations in Lucknow put out banners supporting construction of Ram Temple in Ayodhya
Muslim organizations in Lucknow put out banners supporting construction of Ram Temple in Ayodhya

लखनौ (उत्तर प्रदेश) - अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेवर राममंदिर उभारण्यासाठी मुस्लिमांचा पाठिंबा दर्शविणरे पोस्टर्स काही मुस्लिम संघटनांनी उत्तर प्रदेशमध्ये लावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह काही मुस्लिम नेत्यांचे फोटो पोस्टवर झळकत आहेत.

"हो जन्मभूमि पर मंदिर निर्माण, मुस्लिमों का यही अरमान', असा हिंदी भाषेतील संदेश पोस्टरवर लिहिला आहे. तर दुसऱ्या एका पोस्टरमध्ये "देश के मुसलमानों का यही है मान, श्री राम मंदिर का हो वही निर्माण' असा संदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्ययेतील वादग्रस्त जागेचा मुद्दा परस्पर चर्चेने सोडविण्याचा सल्ला दिल्याने आम्ही हे पोस्टर लावल्याचे मुस्लिम संघटनांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यात राममंदिर उभारण्याची योजना असल्याचे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान अयोध्येतील वादग्रस्त जागेचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणाची तातडीने सुनावणी करण्यात यावी, याबाबत न्यायालयाला विनंती केली आहे. यावर आज निर्णय घेण्यात येणार आहे.

हा वाद परस्पर चर्चेने सोडवावा आणि त्यासाठी न्यायालय मध्यस्थी करण्यास तयार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुचविले आहे. त्यांच्या सूचनेवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. हे प्रकरण जर परस्पर चर्चेने सुटले असते तर न्यायालयापर्यंत पोहोचले नसते, असे म्हणत काही मुस्लिम नेते आणि संघटनांनी हे प्रकरण न्यायालयानेच सोडवावे असा आग्रह धरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com