काँग्रेसमध्ये मुस्लिम महिलांना स्थान नाही का? : पंतप्रधान मोदी 

Muslim women have no place in Congress? : PM Modi
Muslim women have no place in Congress? : PM Modi

आझमगड (उत्तर प्रदेश) : 'तोंडी तलाक'च्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. 'काँग्रेस पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठीच आहे का?', असा प्रश्‍नही पंतप्रधान मोदी यांनी विचारला. 

उत्तर प्रदेशमधील आझमगड येथे पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा झाली. 'विविध मुद्यांवरून गदारोळ घालून संसदेचे कामकाज बंद पाडणाऱ्या विरोधकांनी 'तोंडी तलाक'सारखी महत्त्वाची विधेयके अडविली आहेत', असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. 

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही मोदी यांनी टीका केली. ते म्हणाले, "काँग्रेस पक्ष मुस्लिमांसाठी आहे, अशा आशयाचे विधान राहुल गांधी यांनी केल्याचे मी वर्तमानपत्रात वाचले. याचे मला अजिबात आश्‍चर्य वाटले नाही. मला फक्त इतकेच विचारायचे आहे, की तुमचा पक्ष फक्त मुस्लिम पुरुषांसाठी आहे की मुस्लिम महिलांनाही त्यात स्थान आहे?'' 

'तोंडी तलाकच्या मुद्यावर या पक्षांनी घेतलेल्या भूमिकेने त्यांचेच पितळ उघडे पडले आहे. महिलांचे आयुष्य सुखकर व्हावे, म्हणून केंद्र सरकार एकीकडे प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे, महिलांचे-विशेषत: मुस्लिम महिलांचे आयुष्य खडतरच कसे राहील, यासाठी इतर राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. मुस्लिम महिलांचा स्वाभिमान आणि प्रतिष्ठेला या देशात काही स्थान आहे की नाही? विरोधकांनी यासंदर्भातील विधेयक संसदेत रोखून धरले आहे आणि सभागृहाचे कामकाज होऊ दिले जात नाही', असे मोदी म्हणाले. 

काँग्रेसनेही ट्‌विटरवरून तातडीने मोदी यांच्यावर पलटवार करत 'पंतप्रधान देशातील जनतेशी खोटे बोलत आहेत', असा आरोप केला. 

पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत 340 किलोमीटर लांबीच्या 'पूर्वांचल एक्‍सप्रेस-वे'ची पायाभरणी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com