मुस्लिम शब्द शिवी सारखा वापरला जातोय -ओवेसी

Muslim word is used as bad word - Owaisi
Muslim word is used as bad word - Owaisi

दिल्ली : मुस्लिम तरुणांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात संगणक मला पहायचा आहे. असे मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले होते. परंतु, हे आश्वासन कधीच हवेत विरले असून, मोदींनाही त्याचा विसर पडला आहे. सध्या देशात मुस्लिम हा शब्द एखादी गलिच्छ शिवी असल्यासारखा वापरला जात आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्ही एकाच माळेचे मणी असून त्यांना मुस्लिमांच्या प्रगतीचे काहीही देणेघेणे नाही. असे म्हणत भाजपला देशाची पुन्हा एकदा फाळणी करायची आहे का? असा प्रश्न एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित करत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांवर टिका केली.

ओवेसी म्हणाले, "मोदींना त्यांच्या आश्वासनांचा संपुर्ण विसर पडला आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून किती मुस्लिम तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. किती तरूणांना सैन्यदलात, रेल्वे विभागात व इतरही ठिकाणी नोकरिच्या संधी मिळाल्या आहेत. मोदी सरकारने मुस्लिम समाजाच्या विकासासाठी नक्की काय केले." राहुल गांधी यांचे वक्तव्य आणि त्याच्यावर आलेल्या प्रतिक्रिया यावरून मुस्लिम तरुणांना काय संदेश देणार आहात. असाही प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com