माझे अश्रू म्हणजे माझी कमजोरी नाही- चारु निगम

वृत्तसंस्था
सोमवार, 8 मे 2017

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे आमदार राधा मोहन अगरवाल हे माझ्यावर ओरडल्यानंतर डोळ्यात आलेले अश्रू म्हणजे माझी कमजोरी नाही, असे आयपीएस अधिकारी चारू निगम यांनी फेसबुकवरून आज (सोमवार) म्हटले आहे.

अगरवाल हे भररस्त्यात चारू निगम यांच्यावर ओरडल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. चारू निगम यांनी फेसबुकर एक पोस्ट अपलोड केली आहे. चारू निगम यांच्या फेसबुकवरील पोस्ट सुद्धा मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, अनेकांनी लाईकबरोबरच प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत.

चारू निगम यांनी म्हटले आहे की,
'मेरे आँसुओं को मेरी कमज़ोरी न समझना,
कठोरता से नहीं कोमलता से अश्क झलक गये।
महिला अधिकारी हूँ तुम्हारा गुरूर न देख पायेगा,
सच्चाई में है ज़ोर इतना अपना रंग दिखलाएगा ।

मी एक वरिष्ट अधिकारी आहे. माझ्यासोबत पोलिस सुद्धा होते. परंतु, अगरवाल सर आले आणि एकदम ओरडण्यास सुरवात केली. यामुळे भावनाविवश होऊन डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. प्रसारमाध्यमांनी हे दृष्य दाखविण्यास सुरवात केली. प्रसारमाध्यमांनी खरी परिस्थिती दाखविल्याबद्दल आभार मानते.'

दरम्यान, कोहिवा गावातील महिलांनी दारुची दुकाने बंद करण्याबाबत रास्ता रोको आंदोलन सुरु केले होते. यावेळी महिलांनी आयपीएस महिला अधिकारी चारु निगम यांच्यावर जबरदस्तीने हटविल्याचा आरोप केला. तसेच एका महिलेला मारहाण केल्याची आणि वृद्धाला ढकलल्याचा आरोप केला. त्यावेळी घटनास्थळी आलेले भाजप आमदार राधा मोहनदास अग्रवाल यांनी या आयपीएस अधिकाऱ्याला जोरदार फटकारले. या व्हिडिओमध्ये दिसत आहे, की अग्रवाल चारू निगम यांच्याकडे बोट करून ''मी तुमच्याशी बोलत नाही. मला तुम्ही काही सांगू नका. शांत बसा तुम्ही. माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नका,'' असे बोलत आहेत. या सर्व घटनेनंतर चारू निगम यांना अश्रू अनावर झाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

Web Title: My tears are not my weakness: IPS Charu Nigam