नांदेडः राखीमुळे कैद्यांच्या चेहऱ्यावर हासू...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

ब्रह्माकुमारीज तर्फे कारागृहात रक्षाबंधन

नांदेड : शिक्षा भोगत असलेले कैदी आपल्या मनगटावरील राखी बघून काही वेळ भारावून गेले होते. निमित्त होते रक्षाबंधनाचे. जिल्हा कारागृहात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सेवा केंद्र, कैलासनगर यांच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

ब्रह्माकुमारीज तर्फे कारागृहात रक्षाबंधन

नांदेड : शिक्षा भोगत असलेले कैदी आपल्या मनगटावरील राखी बघून काही वेळ भारावून गेले होते. निमित्त होते रक्षाबंधनाचे. जिल्हा कारागृहात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सेवा केंद्र, कैलासनगर यांच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

सेवाकेंद्राच्या बी.के. पद्मा यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले आणि सत्‌कर्म व राजयोगाच्या नियमित अभ्यासाने आपल्या जीवनात परिवर्तन करावे. योगायोगाने व झालेल्या चुकांमुळे आपण बंदी जीवन कंठीत आहात, याचा ईश्वरीय ज्ञानाने सद्‌उपयोग करून जीवन परिवर्तन करावे, ही एक अमूल्य संधी म्हणून याचा स्वीकार करावा व आपल्याकडून झालेले वाईट व चुकीच्या वर्तणुकीचे प्रायश्चित्त म्हणून आपण दररोज एक तास ईश्वर चिंतन करावे. जीवन परिवर्तन करून आपल्याला मिळालेल्या संधीचा लाभ घ्यावा. आज रक्षाबंधनाच्या सणासाठी प्रत्येक भावाला आपल्या बहिणीची व परिवाराची आठवण प्रकर्षाने होते. आम्ही आपल्या बहिणी मिळून आपणास राखी बांधण्यास आलो आहोत. यासाठी बहिणीस ओवाळणी म्हणून आपण आपल्यातील एक अवगूण किंवा व्यसन दान स्वरूपात द्यावे व त्याची आठवण किमान पुढील वर्षापर्यंत ठेवावी, असे आवाहन पद्मा बहेन यांनी केले. या मार्गदर्शनानंतर ब्रह्माकुमारी विद्यालयाकडून बी. के. शिवप्रिया व इतर बहिणींनी मिळून बंदी बांधवांना राखी बांधून फळांचा प्रसाद दिला.

याप्रसंगी कारागृह अधीक्षक गोविंद राठोड यांनी कार्यक्रमाचे महत्त्व विषद केले. गेल्या तीन वर्षांपासून कारागृहात सुरू असलेल्या ब्रह्माकुमारीज यांच्या राजयोग मेडिटेशन व अध्यात्मिक ज्ञानाचे मार्गदर्शन होत असते. त्यामुळे बंदी बांधवांच्या जीवनात, आचरणात आमुलाग्र बदल झालेला दिसून येत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

टॅग्स