अन्‌ऑफिशियल मोदी!

Narendra Modi
Narendra Modi

"कसे आहात....' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमची थेट मराठीतूनच विचारपूस केली आणि सगळ्यांना सुखद धक्का बसला. चर्चेदरम्यान ते आमच्यात एवढे रममाण झाले की देशाचे पंतप्रधान आणि पत्रकार यांच्यातील सीमा विरळ, विरळ होत होत लुप्त होऊ लागली. फोटो काढताना "चला, चला लवकर... तुम्हीच शेवटचे राहिले आहात...' असा डायलॉग त्यांनी मारला आणि उरलीसुरली सीमा ओलांडून सगळ्यांना जवळ केले. अन्‌ऑफिशियल, ऑफ द रेकॉर्ड चर्चा चांगलीच रंगली, संस्मरणीय ठरली.

संसद अधिवेशन जोरात... दोन्ही सभागृहात नोटाबंदीवरून जोरदार गदारोळ... सुरक्षा व्यवस्था आवळलेली, अशा परिस्थितीतही आम्हाला पंतप्रधान मोदी यांची भेट मिळाली. विशेष म्हणजे सुरक्षेचा आम्हाला कसलाही त्रास झाला नाही, याबाबतीत आम्ही लकी ठरलो. दुपारी सव्वाबारा वाजता महाराष्ट्र राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे आमचे शिष्टमंडळ संसेदच्या नियोजित हॉलमध्ये दाखल झाले. आमची मोजदाद करायला किंवा अन्य खातरजमेसाठी मध्येच एखादा अधिकारी येऊन जाई. त्यांच्यामार्फत "दोन्ही सभागृहातील गोंधळ वाढला आहे, कदाचित कामकाज तहकूब होऊ शकते', असे आमच्या कानावर येई. तेवढ्यात वेंकय्या नायडू येऊन आमच्यासमोर बसले आणि आमची धाकधूक वाढली. मोदींचे रद्द झाले म्हणून नायडू आले काय... वगैरे शंका. मात्र पाच मिनिटांनी म्हणजे बरोबर साडेबारा वाजता मोदींचे आगमन झाले आणि हॉलमध्ये उत्साह संचारला. फिक्कट पिवळ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर खाकी रंगाचे जॅकेट परिधान केलेले पंतप्रधान प्रसन्न मुद्रेत, हसत हसत स्थानापन्न झाले. काय कसे आहात, परवा आलात वाटतं... या त्यांच्या प्रश्‍नाने आमची सर्वांची दांडी गुल झाली. देशाच्या पंतप्रधानांना आम्ही दिल्लीत कधी आलो याची माहिती असावी म्हणजे आमच्यासाठी आश्‍चर्याचा मोठा धक्का होता.

"देवेंद्रजी ने (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री) आप के लिए चार बार फोन किया, तो टाल नही सकता. तय किया एक बार आप से मिल ले....' मोदी यांनी सुरवात केली. "अच्छा, तो बताओ कैसे आना किया' या त्यांच्या प्रश्‍नानंतर समितीच्या वतीने अध्यक्षांनी भेटीचा उद्देश सांगितला आणि आपण आम्हा पत्रकारांना मार्गदर्शन करावे, अशी विनंती. त्यावर मोदी यांची प्रतिक्रिया होती, "बाते तो जरूर होंगी, पर पहले सब का परिचय तो कराओ, भाई' पंतप्रधान खरंच चांगल्या मूडमध्ये आहेत, याची खात्री पटली. सर्वांनी ओळख करून दिल्यानंतर "डिमॉनेटायझेशन के बारे बहुत सारी चर्चा सुरू हुई है, इस मुद्दे पर हमे जरा मार्गदर्शन करिए' आमच्या वतीने पहिला प्रश्‍न पडला.

पंतप्रधान - "हम तो पुराने जमाने हैं, पुराना ही सोचते हैं. आज का युवक बहुत आगे जा रहा है. उस की सोच अलग है. मगर हम उसी सोच से नही सोचते. (क्‍यों पूजा, आप को तो मालूम होगा. एका तरूण पत्रकाराला मोदींचा प्रश्‍न. पंतप्रधानांनी नावानिशी उल्लेख केल्याने पूजाला सुखद मानसिक धक्का, आणखी तिघांचा त्यांनी नावासह उल्लेख केला) युवापिढी की सोच डिजिटल है, रेल मे हर दिन ढाई करोड लोग ट्रॅव्हल करते हैं. जिन मे एक करोड बीस लाख लोग रेल टिकट ऑनलाइन बूक करते है. मैं एक उदाहरण बता रहा हूँ. अगर स्थिती इस तरह बदल रही है तो हम ने उस दिशा मे सोचना है की नही. इस बदलाव को जानना होगा. दुसरी बात - हजार और पाचशे रुपये चलन बारे मे रिझर्व्ह बॅंक एक रिपोर्ट आया. (ऑफ द रेकॉर्ड म्हणून त्यांनी अहवालातील काही धक्कादायक बाबी सांगितल्या, त्यामुळे येथे उल्लेख करणे योग्य नाही) उस मे ऐसी बाते बतायी गयी थी की मुझे बडा सदमा पहुँचा. तो डिमॉनेटायझेशन देश के हित मे हैं. इस के अच्छे परिणाम जरूर सामने आनेवाले हैं. बस थोडा इंतजार किजिए. क्‍यों की सरकार सिर्फ इतना कर के बैठनेवाली नही हैं. इस से मिडल क्‍लास और आम जनता को तकलीफ हो रही हैं, हे सही हैं. हे सारे लोग हमारे वोटर हैं ये मै जानता हूँ. फिर भी अभी तो हमने ये निर्णय लिया है, क्‍यों की वो देश के हित मे और आम आदमी के हित मे हैं. कुछ दिन तकलीफ होगी मगर आखिर कार देश के आम आदमी को लाभ ही होगा.''

"मेरे प्यारे देशवासीयों.... ऐसी आवाज जब आती है तब लोग डरते है....' वॉट्‌सऍप पर ऐसे मेसेज बहुत चल रहे हैं याकडे लक्ष वेधले असता मोदी मोठ्याने हसले आणि म्हणाले "मुझे भी वॉट्‌सऍप मेसेज आते हैं. एक सब्जिया बेचनेवाली औरत कार्ड स्वॅप करने वाली मशीन लेके बैठी है ऐसा फोटो मुझे मिला हैं.'

"आप हमेशा गव्हर्नंन्स की बात करते हैं, ऐसा क्‍यों... इस के पीछे आप का क्‍या विचार हैं'

"सुनो भाई, अपने देश चित्र सामने लाओ. सब रिसोर्सेस देश के पूर्व क्षेत्र मे हैं, फिर भी विकास हुआ है पश्‍चिम क्षेत्र का. ऐसा क्‍यूं है. मुझे लगता है पूर्व क्षेत्र को अच्छा गव्हर्नन्स नही मिला. मै ये नही कह रह हूं की दोनो क्षेत्रो का बराबर विकास हो सकता है. दोनो मे फर्क जरूर रहेगा; मगर एक शिखर पर और दुसरा जमीन पर इतना फर्क नही चल सकता. पूर्व क्षेत्र को उपर उठाना चाहिए.''

अन्य एका प्रश्‍नाला त्रोटक उत्तर देताना (माझ्याकडे निर्देश करत) "सकाल वालों को जादा मालूम होगा', या त्यांच्या वाक्‍याने सर्वांच्या चेहऱ्यावर आश्‍चर्य उमटले. पंतप्रधान एवढी माहिती कशी काय ठेवतात, असा प्रश्‍न सर्वांना पडला.

ओळखी दरम्यान एका पत्रकाराने मी जळगावचा, तापी खोऱ्यातील... असे सांगितले तेव्हा मोदी म्हणाले, अच्छा म्हणजे तुम्ही आमचे शेजारी. दुसऱ्या एका सदस्याला त्यांनी विचारणा केली, "आप इनामदार याने कौन से शहर से आते हैं?' सातारचे कै. लक्ष्मणराव इनामदार हे त्यांचे गुरू होते, त्या संदर्भाने ते खूपच आस्थेवाईकपणे विचारत होते. मी म्हणालो, "मै गुजरात मे बहुत घुमा हूँ, वडनगर भी गया था', असे सांगताच मोठ्या आश्‍चर्याने "वडनगर गये थे क्‍या...' असे त्यांनी आश्‍चर्याने विचारले. वडनगर हे मोदी यांचे जन्मगाव आहे. आम्हा दहा-बारा जणांची त्यांनी प्रेमाने केलेली विचारपूस आणि पंतप्रधानपदाचा कोणताही बडेजाव न दाखवता मोकळेपणाने केलेली चर्चा, आधी दहा मिनिटांचा वेळ दिला असताना, 24 मिनिटे रंगलेल्या गप्पा आणि ग्रुप फोटोनंतर व्यक्तिगत फोटो काढण्याची मान्य केलेली विनंती, प्रत्येकाला जवळ घेऊन फोटोग्राफरला फोटो काढायला लावणे.... आणि शेवटी एकजण राहिल्यानंतर "चला लवकर, तुम्हीच आता शेवटी राहिला आहात' असे मराठीत बोलत त्यासोबत काढलेला फोटो अशा अनेक स्मृतीक्षणांमुळे देशाच्या पंतप्रधानांची भेट चिरस्मरणीय ठरली.
(चर्चा लाइव्ह-जशास तशी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com