नारळ केरळमध्ये होतात, मणिपूरमध्ये नाही! - मोदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

महाराजगंज (उत्तर प्रदेश): कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिपूर येथे केलेल्या "नारळाचा रस' आणि उत्तर प्रदेशमधील "बटाट्याच्या फॅक्‍टरी'च्या उल्लेखाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खिल्ली उडवली आहे.

महाराजगंज (उत्तर प्रदेश): कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिपूर येथे केलेल्या "नारळाचा रस' आणि उत्तर प्रदेशमधील "बटाट्याच्या फॅक्‍टरी'च्या उल्लेखाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खिल्ली उडवली आहे.

राहुल गांधी यांनी मणिपूरमधील सभेमध्ये नारळातील रस काढून तो लंडनला पाठवण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला होता, तर उत्तर प्रदेशमध्ये बटाट्यांचे कारखाने सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यांचा हा सल्ला आणि व्यक्त केलेल्या मनोदयाची आज येथे झालेल्या सभेमध्ये खिल्ली उडवताना मोदी म्हणाले, ""एक कॉंग्रेसचा नेता आहे आणि मी त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. त्यांनी नुकताच मणिपूरच्या सभेमध्ये नारळाचा रस काढून तो लंडनला पाठविण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला. नारळामध्ये पाणी असते (रस नव्हे) आणि त्याची झाडे केरळमध्ये आहेत. हे "बटाट्याची फॅक्‍टरी' सुरू करण्यासारखे आहे. खरेच ते बुद्धिमान आणि दूरदर्शी आहेत. राहुल यांनी बरोबर त्यांना हवे तेच उत्तर प्रदेशात करावे,'' असेही ते म्हणाले.

"जेव्हा एखादा कोणी लंडनमध्ये "नारळाचा रस' पितो आहे आणि त्यावर "मेड इन मणिपूर' असे लिहिले आहे,'' हे मला पाहायचे आहे, असे राहुल मणिपूरच्या सभेत म्हणाल्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले, ""उत्तर प्रदेशमध्ये बोलताना, तुम्ही सर्व जण तुमच्या भागांत "बटाट्याच्या फॅक्‍टरी'ची मागणी करता; पण तुम्हाला हे जाणले पाहिजे, की मी विरोधी पक्षांचा नेता आहे. मी सरकारवर दबाव आणू शकतो; पण निर्णय घेऊ शकत नाही. मी शेतकऱ्यांसाठी बटाट्याची फॅक्‍टरी सुरू करू शकत नाही, असे म्हटल्याचे त्यांनी उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले.''

Web Title: narendra modi attack on rahul gandhi