'सर्जिकल स्ट्राइक'चे खरे 'सर्जन' नरेंद्र मोदी

कर्नल सुरेश पाटील
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

1) पाकिस्तानवर केलेल्या "सर्जिकल स्ट्राइक‘चे खरे "सर्जन नरेंद्र मोदी‘ हेच आहेत. जसा दवाखान्यात सर्जन ऑपरेशन करण्यासाठी असणाऱ्या डॉक्‍टरांसोबत रोग्याच्या व्यवस्थेबद्दल विचारविनिमय, विश्‍लेषण करून त्याचे निदान समजून घेऊन ऑपरेशनची दिशा व दिवस ठरवतात. ऑपरेशन करताना रोग्याच्या इतर अवयवांना इजा पोचणार नाही, याची काळजी घेऊनच शल्य-कौशल्याने खराब झालेला अवयव कीड काढून टाकून रोग्याला भविष्यात त्रास होणार नाही, याची काळजी घेतात.

1) पाकिस्तानवर केलेल्या "सर्जिकल स्ट्राइक‘चे खरे "सर्जन नरेंद्र मोदी‘ हेच आहेत. जसा दवाखान्यात सर्जन ऑपरेशन करण्यासाठी असणाऱ्या डॉक्‍टरांसोबत रोग्याच्या व्यवस्थेबद्दल विचारविनिमय, विश्‍लेषण करून त्याचे निदान समजून घेऊन ऑपरेशनची दिशा व दिवस ठरवतात. ऑपरेशन करताना रोग्याच्या इतर अवयवांना इजा पोचणार नाही, याची काळजी घेऊनच शल्य-कौशल्याने खराब झालेला अवयव कीड काढून टाकून रोग्याला भविष्यात त्रास होणार नाही, याची काळजी घेतात.
2) याच धर्तीवर आपल्या देशाला लागलेल्या दहशतवादाची कीड देशातून पूर्णपणे उन्मळून काढण्यासाठी सर्जिकल स्ट्राइकची दूरदृष्टी आपणास नरेंद्र मोदींच्या राजकीय कारकिर्दीच्या वाटचालीत दिसून येते. या ऑपरेशनसाठी त्यांची संरक्षण सल्लागार, गुप्तचर योजना, भारतीय सैन्य, प्रसारमाध्यमे इ. डॉक्‍टररूपी सहकार्याची मदत घेऊन, पी.ओ.के.मध्ये जाऊन यशस्वी "सर्जरी‘ केली व त्यासाठी जगभरातून प्रशंसा मिळवली. अमेरिकेच्या ""नेव्हीतील‘‘ कमांडोंनी जशी ओसामा बिन लादेनचा खातमा करण्यासाठी जे सर्जिकल ऑपरेशन केले होते, त्या तोडीचे आपल्या भारतीय सैन्याने करून दाखवले आहे व त्यामुळे संरक्षण दलाची प्रतिमा उंचावली आहे.
3) 28 सप्टेंबरच्या सर्जिकल स्ट्राइकची खरी तयारी, ज्या दिवशी नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली, त्या दिवसापासूनच होताना दिसते. शपथविधी समारंभ राष्ट्रपती भवनाच्या प्रशस्त प्रांगणात दिमाखदार पद्धतीने आयोजित करून शेजारी राष्ट्रांचे पंतप्रधान व देश प्रमुखांना बोलावून सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे या कार्यक्रमास पाकिस्तानच्या पंतप्रधान नवाज शरीफ यांना आवर्जून बोलावण्यात ""ब्रेकिंग द आइस‘‘ करून मैत्रीसाठी हात पुढे केला. तद्‌नंतर बऱ्याच वेळा पाकिस्तानाशी आपले संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याचा कळस म्हणजे अचानक मोदी इस्लामाबाद येथे नवाज शरीफ यांच्या घरी जाऊन राजशिष्टाचार न जुमानता सर्वांना एक आश्‍चर्याचा धक्का दिला. विरोधकांनी त्याच्यावर खूप टीका केली. मोदींना काश्‍मीरचा प्रश्‍न होईल तितका समझोत्याने सोडवायचा आहे. त्यांना दोन्ही राष्ट्रांमध्ये युद्ध-रक्तरंजितता, जीवितहानी नको होती; शिवाय अर्थकारणावर ताणही पडू नये, हा दूरदृष्टिकोन होता.
4) मोदींनी 125 कोटी देशवासीयांसाठी "अच्छे दिन‘ आणण्याची प्रतिज्ञा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या आश्‍वासनात वारंवार करून दिली होती व त्यामुळे देशवासीयांनी देशाच्या निवडणुकीत घवघवीत यश त्यांच्या पारड्यात टाकले; मोदींच्या खांद्यावर पराकोटीची जबाबदारी येऊन पडली. "अच्छे दिन‘ आणण्यासाठी योग्य त्या सहकाऱ्यांची निवड करून आपला राष्ट्रबांधणीचा प्रवास सुरू केला.
5) गेल्या दोन वर्षांत त्यांनी जगभर प्रवास करून देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी केलेल्या विविध प्रयत्नांतून त्यांची आंतरराष्ट्रीय राजकारणाची मुत्सद्देगिरी दिसून येते. देशाला आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी "मेक इन इंडिया‘ची भन्नाट कल्पना मांडून राष्ट्रीय संपत्तीची कशी वाढ होईल, यासाठी प्रयत्न केले. तसेच या सर्वांचा परिपाक आपणास "योगा दिवस‘ अंदाजे 150 राष्ट्रांमध्ये यूएनओचा अजेंडा म्हणून साजरा केला. देशाचे पाऊल महासत्ता होण्याच्या दिशेने पडत असताना दोन वर्षांत त्यांनी मागील सरकारांना दोष न देता आपला अजेंडा चालूच ठेवला.
6) आंतरराष्ट्रीय पातळीवर जशी देशाची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न सुरू होता, त्याच वेळेस देशांतर्गत "मन की बात‘, लाल किल्ल्यावरून देशाला दिशा देणारी भावपूर्ण भाषणे करून राष्ट्रनिर्माण व राष्ट्रभावना जागृत करण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. देशाला एकसंघ करण्याचा दृष्टीने युवकांशी संवाद साधून त्यांना प्रेरणादाई दिशा दिली. "स्वच्छ भारत,‘ "बेटी बचाव‘ दारिद्य्ररेषेखालील देशवासीयांसाठी बॅंकांचे कर्ज योजनांचे विविध कार्यक्रम सुरू केले. एक सक्षम राष्ट्राची निर्मिती होत असताना त्यांना विरोधकांनी कायमच टीकेचं लक्ष्य बनवले. तसेच पक्षातील काही नेत्यांच्या चुकीच्या विधानामुळे समाजात तेढ निर्माण होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्वांना बरोबर घेऊन जाताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती.
7) उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवावा, ही प्रचंड मागणी होत असताना त्यांनी संयम दाखवून योग्य वेळी व योग्य दिवशी भारतवासीयांची इच्छा पूर्ण केली. तसेच भारताची आंतरराष्ट्रीय पत वाढविली.