नर्मदा प्रकल्पग्रस्तांना 60 लाखांची भरपाई

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : गुजरातच्या नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला 60 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

प्रकल्पबाधित लोकांच्या नुकसानभरपाईबाबत आणि पुनर्वसनासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्याचा या पूर्वीचा प्रस्तावही मागे घेत सर्वोच्च न्यायालयाने या 681 कुटुंबीयांना दिलासा दिला आहे. सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकल्पाच्या दोन हेक्‍टर जमिनीसाठी प्रत्येक कुटुंबाला 60 लाख देण्याचा आदेश दिला आहे. यानंतर प्रकल्पबाधितांनी महिन्याभरात ही जागा रिकामी करणे अपेक्षित असून, तसे न केल्यास त्यांना जबरदस्ती हाकलण्याचा अधिकार संबंधितांना असल्याचेही या वेळी नमूद करण्यात आले.