काश्मिरी नेते गनाई यांच्या घरावर दहशतवादी हल्ला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

श्रीनगर- येथील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते शौकत गनाई यांच्या घरावर आज दहशतवाद्यांनी अचानकपणे सशस्त्र हल्ला केल्याने खळबळ उडाली. गनाई यांनी अलीकडेच दहशतवादी बुऱ्हाण वाणी याचे समर्थन केले होते.  

गनाई हे जम्मू-काश्मीर विधानपरिषदेतील नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार आहेत. काश्मीरच्या शोपियाँ येथे गनाई यांचे घर आहे. संशयित दहशतवाद्यांनी त्यांच्या या निवासस्थानी हल्ला केला असून, यामध्ये काही जीवित वा वित्तहानी झाल्याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देत गनाई यांच्या सुरक्षारक्षकांनीही त्यांच्यावर गोळीबार केला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा येथे अद्याप दहशतवाद्यांशी चकमक सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.