मुलीला जन्म दिल्याने राष्ट्रीय खेळाडूला दिला तोंडी तलाक

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

शुमेला सध्या आपल्या आई-वडीलांच्या घरात राहत आहे. तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.

अमरोहा - उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील नेटबॉल राष्ट्रीय खेळाडू शुमेला जावेद हिने मुलीला जन्म दिल्याने तिच्या पतीने फोनवरून तीनवेळा तलाक म्हणत तोंडी तलाक दिल्याची घटना समोर आली आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शुमेला सध्या आपल्या आई-वडीलांच्या घरात राहत आहे. तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. मुलीला जन्म दिल्याच्या कारणावरून तिच्या पतीने फोन करून तिला तलाक दिला.

आग्रा शहरातही एका महिलेला जुळ्या मुली झाल्याच्या कारणावरून तलाक देण्यात आला. शहाजहाँपूर येथील 22 वर्षीय अफरीनला जानेवारीमध्ये तिच्या पतीने संदेश पाठवून तलाक दिला होता. देशभरात या कायद्याविरोधात मुस्लिम महिलांनी एकत्र येऊन, हा कायदा मोडीत काढण्यासाठी हस्ताक्षर अभियान सुरु केले आहे.