गावात घुसून हत्तीने केलेल्या हल्ल्यात चार ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जून 2017

कोइम्बतूरमधील वेल्लोरे गावात आज (शुक्रवार) पहाटे जंगली हत्तीने घुसून केलेल्या हल्ल्यात चार जण ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोइम्बतूर (तमिळनाडू) : कोइम्बतूरमधील वेल्लोरे गावात आज (शुक्रवार) पहाटे जंगली हत्तीने घुसून केलेल्या हल्ल्यात चार जण ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोइम्बतूरमधील वेल्लोरे गावात आज पहाटे साडेतीनच्या सुमारास जंगलातून हत्तीने प्रवेश केला. त्यावेळी गावातील नागरिक दाराच्या अंगणात झोपले होते. जंगली हत्तीने बेफामपणे स्थानिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात बारा वर्षाची मुलगी आणि दोन महिलांसह एकूण चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर अन्य काही जणही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान वनविभाग हत्तीचा शोध घेत असून त्याला पुन्हा जंगलात पाठविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हत्तीचा शोध सुरू असून स्थानिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स