सर्जिकल स्ट्राईकनंतर घुसखोरीत 45 टक्क्यांनी घट

वृत्तसंस्था
शनिवार, 3 जून 2017

काश्मीर प्रश्न 'चुटकीं में' सुटू शकणार नाही. त्यासाठी वेळ लागेल. मात्र, आम्ही कायमस्वरूपी उपाय करू. त्या दिशेने आम्ही जात आहोत.
- राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री

नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राईक्सनंतर घुसखोरीचे प्रमाण तब्बल 45 टक्क्यांनी घटले असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (शनिवार) येथे केला. 

केंद्र सरकारच्या गेल्या तीन महिन्यातील कामाचा पत्रकार परिषदेत आढावा घेताना राजनाथ यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अधिक सुधारली असल्याचे सांगितले आणि दहशवादाचे पूर्ण उच्चाटन करण्याचा निर्धार व्यक्त केला. 

ते म्हणाले, 'सुरक्षा दले आणि जम्मू काश्मीरमधील जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. काश्मीरमधील दहशतवादाचा आम्ही नायनाट करू.' राजनाथ यांनी यासाठीचा निश्चित कालावधी सांगितला नाही; मात्र एका प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, 'काश्मीरचा प्रश्न 1947 पासून अस्तित्वात आहे आणि काही महिन्यांत त्याची सोडवणूक करता येणार नाही.'

'काश्मीर प्रश्न 'चुटकीं में' सुटू शकणार नाही. त्यासाठी वेळ लागेल. मात्र, आम्ही कायमस्वरूपी उपाय करू. त्या दिशेने आम्ही जात आहोत,' असे त्यांनी सांगितले. 

भारतामध्ये जगातील दुसऱया क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असतानाही 'इसिस'ला भारतात प्रवेश करणे शक्य झाले नाही, हे यश असल्याचे राजनाथ यांनी सांगितले. 'गेल्या तीन वर्षांत 'इसिस'शी लागेबांधे असलेल्या 90 हून अधिक लोकांना अटक केली आहे. 'इसिस'शी आम्ही यशस्वी मुकाबला करीत आहोत,' असेही त्यांनी सांगितले. 

जम्मू-काश्मीरमधील घुसखोरी, माओवाद्यांचा हिंसाचार आणि ईशान्य भारतातील घुसखोरीमध्ये गेल्या तीन वर्षांत घट झाल्याचा दावा राजनाथ यांनी आकडेवारीसह केला. गेल्या तीन वर्षांत माओवाद्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण 25 टक्क्यांनी घटले आहे. हल्ल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण 42 टक्क्यांनी घटले आहे आणि माओवाद्यांच्या शरणागतीमध्ये 182 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
ऐतिहासिक शेतकरी संपात 48 तासात फूट; एक गट संपावर ठाम
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गंडवलं: शरद पवार
शेतकरी संपाबाबत घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप : जयाजी सूर्यवंशी​
चोपडा: भाजीपाला फेकला रस्त्यावर
शेतकऱ्यांचा संप मागे; कर्जमाफीसाठी समिती 
शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आश्वासने
शेतकऱ्यांच्या पदरात पडले काय?; किसान सभा असमाधानी
सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्याने संप मागे: धोर्डे​

मेनका गांधी रुग्णालयात दाखल