'अभिनेत्यांनी नेता होणे देशासाठी संकटच' 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

एखाद्या व्यक्तीने सिनेमागृहामध्ये राष्ट्रगीतासाठी उभे राहून आपली राष्ट्रभक्ती दाखविण्याची गरज नाही.

बंगळूर : नोटाबंदीच्या मुद्यावरून केंद्रातील मोदी सरकारचे वाभाडे काढणारे दाक्षिणात्य बहुभाषिक अभिनेते प्रकाश राज यांनी आज आपल्या राजकीय प्रवेशाची शक्‍यता फेटाळून लावली.

माझी राजकारणात जाण्याची इच्छा नाही, अन्य अभिनेत्यांनीही राजकारणात जाऊ नये, कारण अभिनेत्यांची चाहत्यांप्रती काही जबाबदारी असते याचे भान त्यांनी ठेवावे. अभिनेत्यांनी नेता होणे हे देशासाठी संकटच असल्याचे मत त्यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत आणि कमल हसन यांच्या नावांचा उल्लेख न करता प्रकाश राज यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

सिनेमागृहांमधील राष्ट्रगीताच्या सक्तीवर भाष्य करताना ते म्हणाले की, "एखाद्या व्यक्तीने सिनेमागृहामध्ये राष्ट्रगीतासाठी उभे राहून आपली राष्ट्रभक्ती दाखविण्याची गरज नाही.''