प्रिया प्रकाशवर युवापिढी लट्टू 

Priya Prakash Varrier
Priya Prakash Varrier

कोची : सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या अभिनेत्री प्रिया प्रकाश हिच्या चेहऱ्यावरील हावभावांवर केरळमधील युवापिढी फिदा झाली असून, तिची व्हायरल झालेली व्हिडिओ क्‍लिप चार दिवसांत चाळीस लाखांहून अधिक जणांनी पाहिली आहे. केरळमधील महाविद्यालयीन युवक-युवती तिच्याच अभिनयाची नक्कल करताना दिसत आहेत. 

"ओरु अडार लव्ह' या आगामी चित्रपटात प्रिया प्रकाशची भूमिका आहे. त्यातील एक गाणे प्रसिद्ध झाले असून, या गाण्यातील तिच्या अदाकारीवर युवापिढी लट्टू झाली आहे. शोभा डे आणि इतर अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही तिच्या या अभिनयाचे कौतुक केले आहे. प्रिया ही मूळ थ्रिसूरची राहणारी असून ती वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिकत आहे. या चित्रपटातील एका लहान भूमिकेसाठी प्रथम तिची निवड झाली होती. आता मात्र दिग्दर्शकांनी तिला प्रमुख भूमिका दिली आहे. चित्रपटातील गाणे प्रसिद्ध झाल्याच्या काही तासांतच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिला सहा लाख फॉलोअर्स मिळाले. हे गाणे युट्यूबवर दोन दिवसांत 43 लाख लोकांनी पाहिले. 

दरम्यान, प्रसिद्ध झालेल्या या गाण्यावरून हैदराबादमधील एका गटाने प्रिया प्रकाशच्या विरोधात याचिका दाखल केली असून ती रद्द करण्याची मागणी करत प्रियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मल्याळी भाषेतील या गाण्याचे इंग्रजीत भाषांतर केल्यास मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या जातात, असा या गटाचा आरोप आहे. मात्र, हेच गाणे गेल्या अनेक वर्षांपासून केरळमध्ये म्हटले जात असल्याचा दावा प्रिया प्रकाश आणि चित्रपट निर्मार्त्यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com