'रोटोमॅक'चा मालक कर्ज बुडवून पळाला 

Vikram Kothari
Vikram Kothari

नवी दिल्ली : अब्जाधीश नीरव मोदी याच्यानंतर रोटोमॅक पेन कंपनीचा प्रवर्तक विक्रम कोठारी कर्ज बुडवून विदेशात पळून गेला आहे. कोठारी याच्यावर विविध बॅंकांचे आठशे कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज आहे. 

कानपूरस्थित रोटोमॅक कंपनीने पाच सरकारी बॅंकांकडून आठशे कोटी रुपयांपेक्षा कर्ज घेतले आहे. यामध्ये अलाहाबाद बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बॅंक आणि युनियन बॅंक ऑफ इंडिया या सरकारी बॅंकांचा समावेश आहे. या बॅंकांनी नियमांचे उल्लंघन करून रोटोमॅक कंपनीला कर्ज दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कोठारी याने मुंबईस्थित युनियन बॅंक ऑफ इंडियाकडून 485 कोटी रुपये आणि कोलकतास्थित अलाहाबाद बॅंकेकडून 352 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर वर्षभर त्याने कर्ज तसेच, त्यावरील व्याजाचा भरणा केलेला नाही. बॅंक ऑफ बडोदाने गेल्या वर्षीच रोटोमॅक कंपनीला कर्जुबुडवी म्हणून जाहीर केले होते. 

पळून गेल्याचा इन्कार 
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विदेशात पळून गेल्याचा कोठारी याने इन्कार केला आहे. "मी कानपूरचा रहिवासी असून, या शहरातच कायम राहणार आहे. मला व्यवसायासाठी विदेशात प्रवास करावा लागतो,' असे कोठारी याने म्हटल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com