या परिस्थितीला काँग्रेस जबाबदार- नितीश कुमार

वृत्तसंस्था
सोमवार, 3 जुलै 2017

आम्ही गळेपडू नाही. कोणीही तशा गैरसमजात राहू नये.

- नितीश कुमार

पाटणा : "सध्याच्या परिस्थितीसाठी काँग्रेस पक्ष जबाबदार असून, ते सर्व पक्षांसोबत चालत नाहीत," अशी घणाघाती टीका संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली. 

नितीश कुमार यांनी पाटणा येथे 'जेडीयू'च्या राज्य कार्यकारिणी सदस्यांच्या बैठकीत बोलताना काँग्रेसला स्पष्ट शब्दांत सांगितले की, "आम्ही गळेपडू नाही. कोणीही तशा गैरसमजात राहू नये. खुशमस्करी करणे हे आमच्या स्वभावात नाही. काँग्रेस हा बिहार सरकारमध्ये सहयोगी पक्ष आहे, आणि त्यांनी सहयोगी पक्षाप्रमाणेच राहावे."

काँग्रेस सर्व विरोधी पक्षांचे नेतृत्व आपल्या पद्धतीने करत असल्याने नितीश कुमार सध्या काँग्रेसवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, नितीश कुमार हे एका विचारधारेचे नव्हे तर अनेक विचारधारांचे नेते आहेत, असे विधान काँग्रेसचे सरचिटणीस गुलाम नबी आझाद यांनी केल्यानंतर दोन्ही पक्षांतील संबंध आणखी ताणले गेले. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाने भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर आझाद यांनी हे विधान केले होते. या विधानामुळे नितीश कुमार चिडले होते. त्यावर नितीश म्हणाले, "काँग्रेसने भिडायला हवं कोणाशी आणि भिडले कोणाशी?"

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​
विवाहातील बचतीतून वऱहाडींना वाटली 2 हजार रोपे​
नाशिक भागात पावसाची उघडीप : शेतीकामांना वेग​