'नवज्योतसिंग सिद्धू हे पाकिस्तानचे एजंट'

harsimrat kaur
harsimrat kaur

नवी दिल्ली- 'नवज्योतसिंग सिद्धू हे पाकिस्तानचे एजंट असून ते पाकचे बोलके बाहुले आहेत', अशी टीका केंद्रिय मंत्री आणि अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर केली आहे. सिद्धू हे पाकिस्तानच्या तालावर नाचणारे आहेत. त्यांना तसेच पाकिस्तानच्या तालावर नाचू द्या. असेही त्यांनी म्हटले आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी करतारपूर मार्ग खुला करण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानशी चर्चा करावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर हरसिमरत कौर यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर टीका केली आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी शीख समाजाची दिशाभूल केली आहे. बाजवा यांनी करतारपूर कॉरिडोर भारतातील शीख बांधवांसाठी खुला करण्याची तयारी दर्शवल्याने त्यांची गळाभेट घेतल्याचे सिद्धू सांगतात. पण ते दिशाभूल करत आहेत. आपल्या जवानांची हत्या करणाऱ्या देशाच्या लष्करप्रमुखाची त्यांनी गळाभेट घेतली. यावर माफी मागण्याऐवजी सिद्धू भारतीयांच्या भावनांशी खेळले, असा आरोपही कौर यांनी केला आहे.

या प्रकरणानंतर, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कुठल्याही प्रकारची चौकशी करत नाहीत. त्यांनी हिंमत असेल तर सिद्धू यांच्यावर कारवाई करायला हवी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com