कुलभूषण प्रकरणी शरीफ व मोदींची होणार बैठक?

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

नवी दिल्लीः भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी व पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले कुलभूषण जाधव या विषयावर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरात लवकर बैठक होणार आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

जाधव हे पाकिस्तानमध्ये नेमके कुठे आहेत, याबाबत पाकिस्तानने अद्याप कळविले नसले तरी त्यांची मुक्तता करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये वरिष्ठ पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत.

मोदी व शरीफ यांच्यादरम्यान लवकरच बैठक होणार आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱयांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. मात्र, ही बैठक केंव्हा व कोठे होणार, याबाबतची माहिती दिलेली नाही.

चीन येथे जून महिन्यात शांघाय कोऑपरेशन ऑरगनाजेशन्स (एससीओ) होत आहे. यावेळी दोन्ही देशांचे पतंप्रधान यावर चर्चा करणार असल्याची माहितीही प्रसारमाध्यमांनी दिली.