ओरिसातील सर्वांत लांब पुलाचे राष्ट्रार्पण

पीटीआय
बुधवार, 19 जुलै 2017

कथाजोडी नदीवर उभारलेला हा पूल भुवनेश्‍वर ते कटकला जोडतो. त्यांची लांबी 2.88 कि.मी आहे. या पुलामुळे या दोन्ही शहरामधील अंतर 12 कि.मीने कमी झाले आहे

भुवनेश्‍वर - ओरिसातील सर्वांत लांब पुलाचे राष्ट्रार्पण मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी बुधवारी केले. नेताजी सुभाषचंद्र बोस पूल असे त्याचे नामकरण केले आहे.

कथाजोडी नदीवर उभारलेला हा पूल भुवनेश्‍वर ते कटकला जोडतो. त्यांची लांबी 2.88 कि.मी आहे. या पुलामुळे या दोन्ही शहरामधील अंतर 12 कि.मीने कमी झाले आहे. "" नव्या पुलामुळे या दोन्ही शहरांतील अंतर कमी होऊन नागरिकांच्या वेळेत बचत होणार आहे. राज्य तसेच नागरिकांच्या प्रगतीसाठी आधुनिक सुविधांचा विकास करण्याचे आमचे प्रयत्न असतात. हा पूल याचे उदाहरण आहे,'' असे पटनाईक यांनी सांगितले.

नेताजी बोस यांचा जन्म व बालपण कटकमध्ये गेले होते. त्यामुळे नेताजींचे नाव या पुलाला देणे आनंददायी असल्याचे त्यांनी सांगितले. या पुलाची पायाभरणी फेब्रुवारी 2011मध्ये पटनाईक यांच्या हस्ते झाली होती.