यूपीत भाजपला पंधरवड्यात मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

प्रदेश भाजपला लागले बदलाचे वेध

लखनौ- उत्तर प्रदेशात योगी आदित्यानाथ यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर आता प्रदेश भाजपला बदलाचे वेध लागले आहेत. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसह अनेक पदाधिकारी मंत्री झाल्याने पक्षसंघटनेत; तसेच राज्य कार्यकारिणीत मोठ्या प्रमाणात बदल होणार हे निश्‍चित मानले जाते. त्यादृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या पंधरा दिवसांत नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाईल असे मानले जाते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य आता उपमुख्यमंत्री झाले आहेत. एक व्यक्ती एक पद या पक्षाच्या तत्त्वानुसार लवकरच मौर्य प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतील. त्यांच्याप्रमाणेच पक्षाचे खजिनदार राजेश आगरवाल, सरचिटणीस सावंत देवसिंग, उपाध्यक्ष धर्मपाल सिंग हेदेखील मंत्री झाल्याने त्यांना ही पदे सोडावी लागणार आहेत. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वाती सिंगदेखील आता मंत्री बनल्या आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अध्यक्षांची निवड केली जाईल. एप्रिलच्या मध्यावर दिल्लीत होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी नव्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीतील काहींना आदित्यनाथ मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. त्यांनाही आपले पद सोडावे लागेल. त्यात उपमुख्यमंत्री झालेले राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश शर्मा, राष्ट्रीय प्रवक्ते श्रीकांत शर्मा, सरचिटणीस सिद्धार्थनाथ सिंग यांचा समावेश आहे.

Web Title: up: The new BJP president