मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

रमजास विद्यालय मारहाण प्रकरण; 25 तक्रारी दाखल

नवी दिल्ली: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) समर्थकांकडून मारहाण झालेल्या सेंट स्टिफन्सन विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांचे जबाब आज दिल्ली पोलिसांनी नोंदविले आहेत.

जबाब नोंदविलेल्यांपैकी एक तरुणी असून, या दोघांना रमजास विद्यालयाच्या परिसरात मारहाण झाली होती. ही मारहाण अभाविपच्या समर्थकांनी केल्याचा आरोप दोघांनी केला आहे. गुन्हे शाखेकडे दोन्ही पक्षांकडून अशा प्रकारच्या 25 तक्रारी आल्या असून, त्याचा तपास सुरू आहे. या तपासात उर्वरित विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

हा प्रकार जेव्हा घडला त्याक्षणी काही पोलिस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असल्याचा आरोपही काही तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी विद्यालय व्यवस्थापनाशी संपर्क साधत या प्रकरणावर शांततापूर्ण तोडगा काढावा, अशी विनंती केली आहे.

देश

कोलकत्ता - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोहर्रमच्या दिवशी...

12.09 PM

बंगळूर : कर्नाटकच्या पोलिस उपमहानिरीक्षक डी. रूपा यांनी भ्रष्टाचार विरोधी पथकास (एसीबी) सादर केलेल्या आणखी एका अहवालामुळे खळबळ...

06.03 AM

नियुक्तीसाठी नवे पाच विभाग कार्मिक मंत्रालयाकडून निश्‍चित नवी दिल्ली: राष्ट्रीय एकात्मतेचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून केंद्र...

05.03 AM