मृत्यूच्या नोंदींसाठी आता आधार क्रमांक आवश्‍यक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: केंद्र सरकारने मृत्यूची नोंद करण्यासाठी एक ऑक्‍टोबरपासून आधार क्रमांक बंधनकारक केला आहे. गृहमंत्रालयाने याबाबतची अधिसूचना काढली आहे.

जम्मू - काश्‍मीर, आसाम व मेघालय ही राज्ये वगळता अन्यत्र याची एक ऑक्‍टोबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या तीन राज्यांसाठी नंतर वेगळी अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे गृहमंत्रालयाने आज स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात बोलताना गृहमंत्रालयातील अधिकारी म्हणाला की, ""आधार क्रमांकामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीची खातरजमा करणे सोयीचे जाणार आहे. तसेच यामुळे ओळख पटण्यातील गैरप्रकार दूर होतील. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठीचे संदर्भ मिळण्यातही अडचण येणार नाही.''

यापुढे ज्यांना मृत्यूचा दाखला पाहिजे असेल तर त्यांना मृत व्यक्तीचा आधार क्रमांक अर्जात नमूद करावा लागणार आहे.