विमान तिकिटांसाठी आधार सक्तीचा विचार नाही

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जुलै 2017

नवी दिल्ली: विमानाचे तिकीट आरक्षित करण्यासाठी आधार क्रमांक बंधनकारक करणे, असा कोणताही विचार सध्या केंद्र सरकार करत नसल्याची माहिती संसदेच्या स्थायी समितीने खासदारांच्या एका गटाला आज दिली.

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली संसदेच्या स्थायी समितीची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत विमान तिकिटासाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्याविषयी सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासदारांच्या गटाला दिली. आधारची माहिती सुरक्षित असून, त्याचा गैरवापर होणार नाही, असा विश्वासही गृह मंत्रालय तसेच, "यूआयडीएआय'च्या प्रतिनिधींनी या वेळी दिला.

बॅंक खाते, मोबाईल क्रमांक तसेच कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार अनिवार्य करण्यात आल्यासंदर्भात एका खासदाराने उपस्थित केलेल्या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांनी तो राजकीय निर्णय असून, आपण त्याविषयी बोलू शकत नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा व अन्य विषयांवरही चर्चा झाली.