रेयान स्कूल विद्यार्थी हत्या प्रकरण; वडिलांच्या याचिकेवर सुनावणी

वृत्तसंस्था
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

सीबीआय, सीबीएसईला कोर्टाची नोटीस

नवी दिल्ली: रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याच्या हत्ये प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना आज सर्वोच्च न्यायालयाने हरियाना सरकार, सीबीआय, सीबीएसई आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाला नोटीस बजावली. मृत प्रद्युन्मच्या वडिलांनी याचिका दाखल केली असून, त्यावर न्यायालयाने तीन आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे.

सीबीआय, सीबीएसईला कोर्टाची नोटीस

नवी दिल्ली: रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याच्या हत्ये प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना आज सर्वोच्च न्यायालयाने हरियाना सरकार, सीबीआय, सीबीएसई आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाला नोटीस बजावली. मृत प्रद्युन्मच्या वडिलांनी याचिका दाखल केली असून, त्यावर न्यायालयाने तीन आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. या पीठात सरन्यायाधीशाव्यतिरिक्त ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश आहे. न्यायालयाच्या आदेशावर प्रद्युन्मचे वडील वरुण ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले आहे. कोर्टाच्या कारवाईबाबत आणि हरियाना सरकारकडून सहकार्य मिळत असल्याचे ते म्हणाले. शाळेतील मुलांच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करावी, प्रद्युन्मच्या हत्येच्या चौकशीसाठी चौकशी आयोगाची नियुक्त करणे जेणेकरून जबाबदारी निश्‍चित होईल, न्यायालय संबंधी प्रकरणाचीही सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. गुरुग्रामच्या रेयान इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी प्रद्युन्मची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी बस वाहकाला ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र, पीडित कुटुंबाला शाळा प्रशासन काहीतरी लपवत असल्याचा संशय आहे. त्यामुळे कुटुंबाने या प्रकरणाची एसआयटी आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

रेयान शाळेच्या दोघांना अटक
दरम्यान, शाळेचे सीईओ रियान पिंटो आणि संचालक अल्बर्ट पिंटो यांची चौकशी करण्यासाठी हरियाना पोलिस मुंबईला पोचली आहे. त्यामुळे चौकशीपूर्वीच शाळा संचालकाने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दिला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी होऊ शकते. तसेच गुरग्रामच्या रेयान स्कूलच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून, काळजीवाहू प्राचार्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शाळेच्या कायदा विभागाचे प्रमुख फ्रान्सिस थॉमस आणि एचआर प्रमुख जेजस थॉमस यांना काल रात्री अटक केली. काळजीवाहू प्राचार्या नीरजा बात्रा यांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच बसचालक सौरभ राघव याने गुरग्राम पोलिस आणि शाळा व्यवस्थापन आपल्यावर दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे.