लालूप्रसाद व तेजस्वीला 'सीबीआय'चे समन्स

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली: रेल्वेच्या दोन हॉटेलच्या निविदांमधील भ्रष्टाचारप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यावर "केंद्रीय अन्वेषण विभागा'ने (सीबीआय) गुरुवारी समन्स बजावले. यानुसार लालूप्रसाद यांना सोमवारी (ता.11) व तेजस्वी यांना मंगळवारी (ता.12) चौकशीसाठी "सीबीआय'समोर हजर राहावे लागणार आहे.

रेल्वेतील या भ्रष्टाचारप्रकरणी "सीबीआय'ने 5 जुलै रोजी लालूप्रसाद, त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेजस्वी, "राजद'चे नेते प्रेमचंद गुप्ता यांची पत्नी सरला गुप्ता, सुजाता हॉटेल्स प्रायव्हेट लि, डिलाईट मार्केटिंग कंपनी प्रा.लि. लारा प्रोजेक्‍ट एलएलपी कंपनीचे संचालक विजय आणि विनय कोचर, "आयआरसीटीसी'चे माजी व्यवस्थापकीय संचालक पी. के. गोयल यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तसेच पाटणा, रांची, भुवनेश्‍वर, दिल्ली आणि गुरुग्राम येथील लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांशी संबंधित ठिकाणांवर छापे घातले होते.
लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रेल्वेची "बीएनआर रांची' आणि "बीएनआर पुरी' या दोन हॉटेलचे व्यवस्थापन विनय व विजय कोचर यांच्या मालकीच्या खासगी सुजाता हॉटेलकडे दिले होते. यासाठी निविदा प्रक्रियेत फेरफार करण्यात आला. तसेच बेनामी कंपनीद्वारे पाटण्यातील मोक्‍याच्या ठिकाणी असलेली तीन एकर जमीनीची लाच त्यांनी स्वीकारली होती. यासाठी त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केला, असे "एफआयआर'मध्ये म्हटले आहे. लालू यांनी याप्रकरणी अप्रामाणिक व फसवणूक केली असल्याचेही म्हटले आहे.