बेकायदा आयातप्रकरणी बंगाल, बिहारमध्ये छापे

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

करचुकवेगिरी करणाऱ्यांवर सीबीआयची कारवाई

नवी दिल्ली : सीमा शुल्क अधिकाऱ्यांना हाताशी धरून देशात बेकायदा सुरू असलेल्या आयातप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पश्‍चिम बंगाल आणि बिहारमध्ये मंगळवारी छापे घातले.

करचुकवेगिरी करणाऱ्यांवर सीबीआयची कारवाई

नवी दिल्ली : सीमा शुल्क अधिकाऱ्यांना हाताशी धरून देशात बेकायदा सुरू असलेल्या आयातप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पश्‍चिम बंगाल आणि बिहारमध्ये मंगळवारी छापे घातले.

सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदा आयातप्रकरणी सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त नवनीत कुमार आणि अधिकारी विकी कुमार यांच्यासह मोहम्मद नसरुद्दीन या नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल झाले. नवनीत कुमार आणि विकी कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्यापारी बेकायदा आयात करीत होते. यामुळे सरकारचे सीमा शुल्क बुडून महसुली फटका बसत होता.

याप्रकरणी आज पश्‍चिम बंगाल आणि बिहारमध्ये सीबीआयने छापे घातले. पश्‍चिम बंगालमध्ये कोलकत्यात सात ठिकाणी आणि उत्तर 24 परगण्यात एका ठिकाणी छापे घालण्यात आले, तर बिहारमध्ये एका ठिकाणी छापा घालण्यात आला. या करचुकवेगिरीचा तपास सीबीआयकडून सुरू असून, या प्रकरणाशी निगडित अनेक अधिकारी आणि व्यापाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

Web Title: new delhi news Impressions of illegal import raid in Bengal, Bihar