सुरक्षा दलांकडे कोणतेही आव्हान पेलण्याची क्षमता: जेटली

वृत्तसंस्था
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: डोकलाममधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा दले आगामी काळात उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याची माहिती संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत दिली.

नवी दिल्ली: डोकलाममधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा दले आगामी काळात उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याची माहिती संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत दिली.

चीनच्या तिबेटमधील हालचालीविषयीचा एक अहवाल तसेच, भारतापेक्षा पाकिस्तानमधील संरक्षण उद्योगाची स्थिती उत्तम, असा एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने केलेला दावा, यांवरून उपस्थित केलेल्या प्रश्नास उत्तर देताना जेटली बोलत होते. जेटली म्हणाले, ""भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्याची क्षमता संरक्षण दलांमध्ये असून, त्यासाठी आवश्‍यक सामग्रीही उपलब्ध आहे. यापूर्वीही मी ही बाब स्पष्ट केली असून, याविषयी कोणीही शंका उपस्थित करू नये.''
आवश्‍यक शस्त्रास्त्रे बाहेरून खरेदी करून सुरक्षा दलांच्या गरजा पूर्ण होणार नाहीत; तर त्यांची स्वदेशात निर्मिती होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे दारूगोळा व शस्त्रनिर्मिती करणारे कारखाने सुरूच राहतील, त्यातील कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही कपात होणार नाही, असेही जेटली यांनी स्पष्ट केले.

विरोधकांबरोबर सत्ताधाऱ्यांनाही बोलण्याची संधी हवी ः रविशंकर प्रसाद
नवी दिल्ली ः संसदेत विरोधकांना बोलण्याचा हक्क आहे, मात्र त्यांबरोबर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाही बोलण्याची संधी मिळावी. तरच संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालू शकते, असे मत केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज व्यक्त केले. राज्यसभेचे नवनियुक्त अध्यक्ष वेंकय्या नायडू यांचे स्वागत करतानाच सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग होईल, अशी अपेक्षा प्रसाद यांनी व्यक्त केली. नायडू यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण नेते म्हणून उदयास आले, त्यापैकी आपण एक असून, त्याचा आपल्याला अभिमान असल्याचेही प्रसाद यांनी नमूद केले.