भारत, बांगलादेश, नेपाळमधील पूरग्रस्तांना गुगलचा मदतीचा हात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली: भारत, नेपाळ आणि बांगलादेशमधील पूरस्थिती मदतकार्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी गुगल दहा लाख डॉलरचा निधी देणार आहे. पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या "गूँज' आणि "सेव्ह द चिल्ड्रन' या दोन स्वयंसेवी संस्थांना हा निधी मिळणार आहे.

भारत, नेपाळ आणि बांगलादेशमधील एक लाख 60 हजार पूरग्रस्तांपर्यंत मदत पोचविण्याचे काम "सेव्ह द चिल्ड्रन' करीत आहे. पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना अन्न आणि अन्य जीवनावश्‍यक वस्तू पुरविण्याचे काम संस्था करीत आहे. तसेच, तात्पुरता निवारा उभारणे, जलस्रोतांचे पुनर्भरण आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा उभारणीचे कामही संस्था करीत आहे. "गूँज' भारतातील पूरग्रस्त नऊ राज्यांमध्ये मदतकार्य राबवत आहे. ही संस्था पूरग्रस्तांना अन्न, ब्लॅंकेट, स्वच्छतेच्या वस्तू पुरवत आहे. तसेच, पूरग्रस्तांना घरे, रस्ते, पूल, शाळा बांधून देण्याचे काम संस्था करीत आहे.

गुगलकडून "एसओएस अलर्ट'
तीन देशांमधील पूरस्थिती मदतकार्यासाठी गुगलच्या प्रतिसाद पथकाने "एसओएस अलर्ट' तयार केला आहे. यामध्ये पुरासंबंधी ताज्या बातम्या, पूरग्रस्त भागाचा नकाशा, ट्‌विटर आणि अन्य स्रोतांवरील स्थानिक अपडेट यांचा समावेश आहे.