चीन सीमेलगत रस्ते बांधणीला वेग

चीन सीमेलगत रस्ते बांधणीला वेग

नवी दिल्ली : डोकलाममधील वादाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय लष्कराने भारत-चीन सीमेलगत मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी वेगाने काम सुरू केले आहे. सीमा भागात जवानांना वेगाने हालचाली करता येण्यासाठी लष्कराच्या कोअर ऑफ इंजिनिअर्स (सीओई) हा विभाग अथक प्रयत्न करत आहे.

"सीओई' या विभागाला 237 वर्षांचा इतिहास आहे. जवानांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि सीमा भागात त्यांच्या वेगवान हालचालींसाठी दळणवळण निर्माण करणे, हे या विभागाचे काम आहे. "सीओई'मधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगर फोडण्याची आणि रस्ते बांधण्याची विविध यंत्रे, जवानांची ने-आण करण्यासाठीचे ट्रक आणि इतर सामग्री खरेदी केली असून, ही वाहने आणि यंत्रे लवकरच ताब्यात मिळतील. "सीओई'ची भूसुरुंग शोधण्याची क्षमता वाढविण्यासाठी लष्करी मुख्यालयाने एक हजार भूसुरुंगशोधक यंत्रेही मागविली आहेत. पर्वतीय भागात वेगाने हालचाल करण्यायोग्य रस्ते बांधण्यासाठीही जवळपास शंभर दगड फोडणारी अत्याधुनिक यंत्रे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवाय, अल्पकाळ वापरासाठीचे पन्नास पूलही मागविण्यात आले आहेत.

लष्कराने आखलेल्या योजनेनुसार, "सीओई'मधील अभियंते प्रथम पर्वतीय प्रदेशातील सपाट भागांवर रस्ते बांधणी करतील. त्यानंतर आवश्‍यकता भासल्यास सीमा रस्तेबांधणी संघटनेकडून (बीआरओ) हे रस्ते आणखी मजबूत केले जातील. 2005 मध्ये भारत-चीन सीमेवरील व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांमध्ये 73 रस्ते बांधण्यास "बीआरओ'ला सांगण्यात आले होते. मात्र, या कामाला प्रचंड विलंब झाल्याने लष्कराने नाराजी व्यक्त केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com