केरळमधील हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

संघाचे सरसहकार्यवाह होसबळे यांची मागणी

नवी दिल्ली: केरळमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हिंसाचारात आतापावेतो 300 व गेल्या वर्षभरात 14 संघ कार्यकर्त्यांचे बळी गेले आहेत. या हिंसाचाराची न्यायालयीन फास्ट ट्रॅक चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज केली. देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री हे दोघेही संघ स्वयंसेवक असले, तरी केरळमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा निर्णय संघ त्यांच्या विवेकबुद्धीवर सोडतो, असेही संघाने सूचकपणे म्हटले आहे.

केरळमध्ये बस्तान बसविण्याची धडपड करणाऱ्या संघ व भाजप कार्यकर्त्यांवर कथित जीवघेणे हल्ले वाढत चालल्याचा आरोप केला जातो. संसदेतही यावरून वेळोवेळी विषय उपस्थित होतात. संघाचे सरसहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन केरळमधील डाव्या हिंसेच्या तांडवाबाबत व्यथा मांडली. "प्रज्ञा प्रवाह'चे नंदकुमार, दिल्लीचे भारत भूषण, "ऑर्गनायजर'चे संपादक प्रफुल्ल केतकर आदी उपस्थित होते. या राज्यात राष्ट्रपती राजटीची मागणी जनतेतून यायला हवी व तशी राजवट आणली तरी डाव्यांचा हिंसाचार थांबेल याची खात्री काय, असा प्रतिप्रश्‍न करून होसबळे यांनी संघपरिवार पुढच्या निवडणुकीची वाट पाहील असे संकेत दिले. ते म्हणाले, की अशा कारणासाठी बोलावे लागल्याचा खेद व क्रोध संघाला होतो. मात्र केरळमधील डाव्यांच्या हिंसक कारवायांनी आता कळस गाठला आहे. माकप कार्यकर्त्यांना विरोध करणाऱ्या कॉंग्रेस, मुस्लिम लीग व खुद्द त्या पक्षाच्याही लोकांना हिंसाचाराची झळ बसली आहे. संघाच्या कार्यकर्त्यांवर 1969 पासून सतत हल्ले होत आहेत, असे त्यांनी सांगितले.

विश्‍वासाचा इतिहास नाही
केरळमध्ये एखादी व्यक्ती मरण पावली, की तिला केळीच्या पानावर ठेवण्याची प्रथा आहे. माकप हल्लेखोर अनेक संघ कार्यकर्त्यांच्या घरासमोर रात्री केळीची पाने ठेवतात व खुनाचा इशारा देतात, असे होसबळे म्हणाले. त्यांनी माकप नेते सीताराम येचुरी यांनी उभय पक्षांत चर्चा करण्याचे आवाहन केले, त्याचे स्वागत करतानाच कम्युनिस्टांचा इतिहास त्यांच्या अशा प्रस्तावांवर विश्‍वास ठेवावा असा नाही, अशीही पुस्ती जोडली.

Web Title: new delhi news Judicial inquiry of kerala violence