'सीबीआय' चौकशीला लालूंची पुन्हा दांडी

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

आणखी दोन आठवड्यांच्या मुदतीची मागणी

नवी दिल्ली: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी रेल्वे हॉटेल निविदा गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीकडे पुन्हा पाठ फिरवल्याचे आज स्पष्ट झाले. आपल्याला आणखी दोन आठवड्यांची मुदत मिळावी, अशी मागणी लालूंनी सीबीआयकडे केली आहे.

या प्रकरणी सीबीआयने लालूप्रसाद यांना समन्स पाठवून सोमवारी चौकशीस उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, आज लालूंनी स्वतः उपस्थित राहण्याऐवजी आपल्या वकिलांना सीबीआयच्या मुख्यालयात पाठविले. लालूप्रसाद यांना आणखी दोन आठवड्यांचा अवधी द्यावा, अशी विनंती त्यांच्या वकिलाने सीबीआयला केली आहे. याबाबत विचार सुरू असून, त्यानुसार पावले उचलली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणी तेजस्वी यादव यांनाही चौकशीसाठी 26 सप्टेंबर रोजी पाचारण करण्यात आले असून, ते उपस्थित राहणार का, यावर भाष्य करणे लालूप्रसाद यांच्या वकिलाने टाळले. यापूर्वी दोघांना अनुक्रमे 11 व 12 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र, दोघेही उपस्थित राहू शकले नव्हते.

Web Title: new delhi news lalu prasad yadav and cbi