महात्मा गांधींच्या पुतळ्याचे राजघाटावर अनावरण

वृत्तसंस्था
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त आज उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी महात्मा गांधी यांच्या 1.8 मीटर उंचीच्या ब्रॉंझच्या पुतळ्याचे अनावरण केले. प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांनी हा पुतळा तयार केला असून, तो राजघाट येथे बसविण्यात आला आहे. या पुतळ्याची किमत ही आठ लाख 73 हजार इतकी असल्याचे प्रसिद्धीस असलेल्या पत्रकात म्हटले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे समाधिस्थळ असलेल्या राजघाट येथे पहिल्यांदाच नवीन सुविधा उपलब्ध झाल्या असून, त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत आहेत. ग्रेनाइटच्या दोन फूट उंचीवर हा पुतळा बसविला आहे. राजघाटावरील या पुतळ्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात सुधारणांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. राजघाटावर दररोज दहा हजार पर्यटक भेट देत असून, त्यात अनेक परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. पार्किंगच्या जागेतील इंटरप्रिटेशन केंद्राचे उद्‌घाटनही नायडू यांनी या वेळी केले. 59 लाखांचे एलईडी स्क्रीनचा वापर करून गांधीजींच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. त्याशिवाय पर्यटकांना गांधीजींवरील चित्रपट आणि त्यांची भाषणेही ऐकता येणार आहेत, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.