दिल्लीत बसमध्येच हस्तमैथून; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

नवी दिल्लीः राजधानीत एका मध्यमवयाच्या नागरिकाने धावत्या बसमध्ये हस्तमैथून केल्याची घटना घडली असून, एका विद्यार्थ्याने संबंधित व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर खळबळ उडाली आहे.

दक्षिण दिल्लीतील वसंत विहारमध्ये बुधवारी (ता. 7) ही घटना घडली. एक मध्यमवयीन नागरिक धावत्या बसमध्ये हस्तमैथून करत होता. त्याच्या शेजारी एक महिला बसली होती. तो तिला स्पर्श करण्याचाही प्रयत्न करत होता. बसमध्येच त्याचे कृत्य सुरू होते. परंतु, कोणीही त्याला एका शब्हानेही बोलले नाही. एका विद्यार्थ्याने संबंधित व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या युवकाशेजारी बसलेली महिला तीन दिवसानंतर तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस चौकीमध्ये गेली होती. महिलेला चौकीमध्ये तब्बल सात तास बसवून ठेवण्यात आले.

महिलेने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, 'संबंधित युवक माझ्या शेजारीली सीटवर बसला होता. तो हस्तमैथून करत होता, शिवाय तो मला स्पर्श करण्याचाही प्रयत्न करता होता. मी त्याला ओरडलेही. परंतु, इतर कोणीही त्याच्यावर ओरडले नाही. व्हि़डिओ क्लिपमध्ये त्या नागरिकाचा चेहरा सस्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक करावी.'

दरम्यान, 2012 मध्ये एका विद्यार्थीनीवर धावत्या बसमध्येच बलात्कार करून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. संपूर्ण जगभर ही घटना पोहचली होती. मात्र, राजधानीमध्ये अद्यापही महिलांसाठी प्रवास सुरक्षित नसल्याचा दावा महिला करत आहेत.

Web Title: new delhi news man masturbates In delhi bus video viral