प्रत्येक मोबाईलमध्ये येणार 'जीपीएस'प्रणाली

वृत्तसंस्था
सोमवार, 10 जुलै 2017

नवी दिल्ली: प्रत्येक मोबाईलमध्ये "जीपीएस' प्रणाली सुरू करण्याची केंद्र सरकारची योजना असून, याबाबत मोबाईल उत्पादक कंपन्यांना कळविण्यात आले आहे. प्रत्येक मोबाईलमध्ये "जीपीएस'प्रणाली सुरू केल्यास त्याचा खर्च 30 टक्‍क्‍यांनी वाढणार आहे. मात्र, केंद्र सरकार सुरक्षेसाठी "जीपीएस' प्रणाली सुरू करण्यावर ठाम आहे.

1 जानेवारी 2018 पासून प्रत्येक मोबाईलमध्ये जीपीएस प्रणाली यावी, असे सरकारचे नियोजन आहे. "जीपीएस'सोबत पॅनिक बटनाचीही सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू आहे. याबाबत "जीपीएस' प्रणालीमुळे मोबाईल हॅंडसेट उत्पादक कंपन्यांनी प्रति हॅंडसेट 500 रुपये ते 1500 रुपये खर्च वाढणार असल्याचे कळविले आहे, असे वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे.