डोकलाममधील चीनच्या रस्त्यांबाबत मोदींनी खुलासा करावा: राहुल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली: डोकलाम परिसरात चीनकडून सुरू करण्यात आलेल्या रस्त्यांच्या बांधणीसंदर्भातील अहवालाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या छातीत दम असल्यास खुलासा करावा, असे आव्हान कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे.

चीनने सैन्याची संख्या वाढवून वादग्रस्त भागापासून 12 किलोमीटर अंतरावर सुरू केलेल्या रस्त्याच्या कामानंतर राहुल यांनी ट्विट केले आहे. चीनच्या रस्ते बांधणीबाबतच्या बातम्यांचा हवाला देऊन त्यांनी हे ट्विट केले आहे. सुमारे 500 सैनिकांच्या संरक्षणात चीनने डोकलाममध्ये रस्ते बांधण्यास सुरवात केली आहे. गेल्या 16 जूनपासून चीन आणि भारताच्या संरक्षण दलांनी वादग्रस्त भागातील रहदारी रोखून धरल्याने तणावाची स्थिती होती.