अभ्यासावरून रागावल्याने आई व बहिणीची हत्या

file photo
file photo

नोएडात सोळा वर्षे वयाच्या मुलाची कबुली

नवी दिल्ली : अभ्यास केला नाही म्हणून आई रागावल्याने 16 वर्षे वयाच्या मुलाने त्याच्या आईची आणि बहिणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीतील नोएडा भागात घडला आहे. 5 डिसेंबरला नोएडा भागात हे दुहेरी हत्याकांड घडले. अत्यंत क्रूर पद्धतीने या दोन हत्या झाल्या होत्या. त्यानंतर या घरातील मुलगा फरार होता. त्यामुळे पोलिसांचा पहिला संशय या मुलावरच होता. शुक्रवारी या मुलाला अटक करण्यात आली.

आई अभ्यासासाठी रागवत होती आणि बहिणीनेही वाद घातला होता, म्हणून त्या दोघींची हत्या केल्याची कबुली या मुलाने पोलिसांकडे दिली. आपल्याच आई आणि बहिणीच्या जिवावर उठणाऱ्या या मुलाला वाराणसीतून अटक करण्यात आली आहे. 16 वर्षे वयाचा हा मुलगा 5 डिसेंबरला आईची हत्या करून फरार झाला. त्या वेळी त्याने त्याच्या आईचा फोन आणि सुमारे दीड ते दोन लाखांची रोकड पळवली, अशीही माहिती पोलिसांनी दिली.

सोफ्यावर न बसता डायनिंग टेबलवर बस आणि अभ्यास पूर्ण कर, असे आईने या मुलाला 5 डिसेंबरला बजावले होते. तसेच तो अभ्यासाकडे दुर्लक्ष करत असल्याने त्याला ती रागावलीही होती. तिने तिच्या मुलाला दोन फटकेही लगावले होते. या गोष्टीचा राग या मुलाच्या मनात राहिला. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्याने आईवर क्रिकेट बॅटने वार केले. त्याचवेळी त्याची 11 वर्षांची बहीण झोपेतून उठली, असे त्याला वाटले. त्यामुळे या मुलाने तिच्यावरही वार केले. तसेच धारदार कात्री आणि पिझ्झा कटरनेही आई आणि बहिणीवर वार केले. या सगळ्या हल्ल्यात या दोघींचा जागीच मृत्यू झाला. या दोघींची हत्या करून हा सोळा वर्षांचा मुलगा रात्री 11.15च्या सुमारास घराबाहेर पडला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा मुलगा बाहेर पडत असताना दिसतो आहे. त्यावरूनच पोलिसांनी त्याला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com