प्रणवदा, तुम्ही मला पितृतुल्य

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मोदींच्या पत्राला मुखर्जींकडून उजाळा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर स्तुतिसुमने उधळत त्यांच्या कार्याचे कौतुक केल्याचे उघड झाले आहे. प्रणवदा, तुम्ही नेहमीच मला पितृतुल्य आणि गुरुस्थानी होता, असे मोदी यांनी त्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. प्रणवदा राष्ट्रपतिपदावरून पायउतार होण्याच्या शेवटच्या दिवशी मोदींनी त्यांना हे पत्र लिहिले होते. यामुळे भिन्न विचारसरणीच्या या दोन नेत्यांमधील ऋणानुबंधांवर नव्याने प्रकाश पडला आहे.

आज खुद्द प्रवणदांनीच ट्विटरवरून याची माहिती दिली. शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी लिहिलेल्या पत्राने माझ्या हृदयाला स्पर्श केला असून, त्यातील विचार मी आपणांशी शेअर करत असल्याचे मुखर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटला मोदींनीही सकारात्मक प्रतिसाद देत प्रणवदा तुम्हीच माझी देखभाल केल्याचे ट्विट केले.

या पत्रामध्ये मोदी यांनी म्हटले आहे की, "तीन वर्षांपूर्वी मी दिल्लीत आलो तेव्हा नवखा होतो. माझ्यासमोर काम आणि आव्हाने मोठी होती. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही माझी वडिलांप्रमाणे देखभाल करत माझे मार्गदर्शकही झालात. तुमची बुद्धिमत्ता, मार्गदर्शन आणि वैयक्तिक सहानुभूती यामुळे मला आत्मविश्‍वास आणि ताकद मिळाली. आपल्या बौद्धिक ताकदीने नेहमीच मला मदत केली.''