अठरा हजार एनजीओंनी विवरणपत्रेच भरली नाहीत; राज्यसभेत माहिती

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 जुलै 2017

नवी दिल्ली : देशातील 18 हजारपेक्षा अधिक स्वयंसेवी संस्थांनी (एनजीओ) 2010-11 ते 2014-15 या पाच वर्षांच्या कालावधीत प्राप्तिकर विवरणपत्रे भरली नाहीत, अशी माहिती केंद्र सरकारने बुधवारी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : देशातील 18 हजारपेक्षा अधिक स्वयंसेवी संस्थांनी (एनजीओ) 2010-11 ते 2014-15 या पाच वर्षांच्या कालावधीत प्राप्तिकर विवरणपत्रे भरली नाहीत, अशी माहिती केंद्र सरकारने बुधवारी राज्यसभेत दिली.

याविषयी लेखी उत्तरात केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले, की देशातील 18 हजारपेक्षा अधिक स्वयंसेवी संस्थांनी 2010-11 ते 2014-15 या पाच वर्षांत प्राप्तिकर विवरणपत्रे भरलेली नाहीत. त्यांना ही विवरणपत्रे भरण्यासाठी एक महिन्याचा कालावधीही देण्यात आला होता. सरकारी नियमांचे पालन आठ हजारपेक्षा अधिक स्वयंसेवी संस्थांनी केले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या सहा हजार स्वयंसेवी संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

परकी निधी नियामक कायद्यांतर्गत (एफसीआरए) नोंदणी केलेल्या स्वयंसेवी संस्थांची वैध बॅंक खाती नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना वैध बॅंक खात्याची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एफसीआरए अंतर्गत सुमारे 25 हजार स्वयंसेवी संस्थांनी नोंदणी केली असून, यातील सुमारे 20 हजार स्वयंसेवी संस्थांची वैध बॅंक खाती आहेत, असे रिजिजू यांनी नमूद केले.

. . . . . .

टॅग्स