नितीश यांच्या खेळीची चार महिन्यांपासून कल्पना: राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जुलै 2017

नवी दिल्ली: "नितीशकुमार भारतीय जनता पक्षाशी युती करणार, हे मला तीन-चार महिन्यांपूर्वीच माहीत होते,'' असा खुलासा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला.

बिहारमधील राजकीय उलथापालथीच्या पार्श्‍वभूमीवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राहुल गांधी यांची प्रतिक्रिया विचारली. तेव्हा ते म्हणाले, ""जातीयवादी शक्तींच्याविरोधात लढा देण्यासाठी नितीशकुमार यांनी आमच्याशी युती केली होती; परंतु त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जातीयवादी पक्षांशी आता हातमिळवणी केली. त्यांनी बिहारच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भारतीय राजकारणातील हीच समस्या आहे.''

"नितीशकुमार मला भेटले होते. मात्र, तेव्हा त्यांनी या निर्णयाबद्दल चकार शब्दही काढला नव्हता. मात्र, तरीही गेल्या तीन-चार महिन्यांपासून मला नितीशकुमार असे काहीतरी करणार, याची कुणकुण होतीच. लोक काय विचार करतात, याची कल्पना राजकारणात असल्याने मला येते,'' असे राहुल गांधी म्हणाले.

"स्वार्थासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्या मागे कोणतीही तत्त्वे नसतात, त्यांच्याकडे विश्‍वासार्हता नसते. सत्ता मिळविण्यासाठी ते काहीही करू शकतात,'' असे राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.