नोटाबंदीच्या अहवालाला आज अंतिम स्वरूप

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जुलै 2017

संसदीय समिती चालू अधिवेशनात सादर करणार

नवी दिल्ली: नोटाबंदीबाबतच्या अहवालाला संसदीय समिती उद्या (गुरुवार) अंतिम स्वरूप देण्याची शक्‍यता असून, संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात तो मांडण्यात येणार आहे.

संसदीय समिती चालू अधिवेशनात सादर करणार

नवी दिल्ली: नोटाबंदीबाबतच्या अहवालाला संसदीय समिती उद्या (गुरुवार) अंतिम स्वरूप देण्याची शक्‍यता असून, संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात तो मांडण्यात येणार आहे.

कॉंग्रेस नेते वीरप्पा मोईली यांच्या नेतृत्वाखालील संसदेची अर्थविषयक स्थायी समिती नोटाबंदीच्या निर्णयाची तपासणी करीत आहेत. ही समिती उद्या आपल्या अहवालाला अंतिम स्वरूप देणार आहे. या समितीने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संघटना "नॅसकॉम'ला डिजिटल व्यवहारांबाबत तर निती आयोगाला धोरणात्मक मुद्द्यावर सादरीकरण करण्यास बोलाविले आहे. या महिन्याच्या सुरवातीला मोईली यांनी नोटाबंदीबाबतचा तपासणी अहवाल संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 17 जुलैला सादर करण्यात येईल, असे म्हटले होते. हे अधिवेशन 11 ऑगस्टला संपत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समितीने बुडीत कर्जे आणि बॅंकिंग क्षेत्रातील आव्हाने याबाबातचा अहवाल अंतिम केला आहे. समितीने याआधी पाचशे व हजारच्या जुन्या नोटा रद्द करण्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे देशात चलन टंचाई निर्माण होऊन नागरिकांच्या मोठ्या रांगा बॅंका आणि एटीएमबाहेर लागल्या होत्या. रिझर्व्ह बॅंकेने पाचशे व दोन हजारच्या नव्या नोटा चलनात मोठ्या प्रमाणात आणल्यानंतर ही चलनटंचाई काही प्रमाणात कमी झाली.