लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्‍टराची संख्या नगण्य: आरोग्य राज्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

संसद अधिवेशन- लोकसभा

नवी दिल्ली: भारतात प्रत्येक एक हजार नागरिकांसाठी सरासरी एक डॉक्‍टरही नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षा ही संख्या कमी असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली.

प्रश्‍नोत्तराच्या तासात बोलताना त्या म्हणाल्या,"भारतीय वैद्यकीय परिषदेने दिलेल्या माहितीनुसार यंदा 31 मार्चपर्यंत राज्य वैद्यकीय परिषद किंवा भारतीय वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी केलेल्या ऍलोपॅथीच्या डॉक्‍टरांची संख्या दहा लाख 22 हजार 859 आहे. 80 टक्के उपलब्धता लक्षात घेतल्यास 8.18 लाख डॉक्‍टर प्रत्यक्ष सेवा देऊ शकतात. डॉक्‍टर व सध्याची 1.33 अब्ज लोकसंख्या गृहित धरल्यास हा दर 0.62ः1000 असा निघतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार हा दर 1ः1000 असा असायला पाहिजे.''

"डॉक्‍टर -लोकसंख्या हा दर ऑस्ट्रेलियात 3.374 ः 1000, ब्राझीलमध्ये 1.852ः1000, चीनमध्ये 1.49 ः1000, अफगणिस्तानला 0.304 ः 1000 तर पाकिस्तानमध्ये 0.806ः1000 असा आहे. भारतात हा दर वाढविण्यावर सरकारचा भर आहे,'' असे त्यांनी सांगितले.