पाकिस्तानी महिलेने मानले परराष्ट्रमंत्री स्वराज यांचे आभार

वृत्तसंस्था
शनिवार, 29 जुलै 2017

वैद्यकीय उपचारासाठी पाकच्या नागरिकाला व्हिसा

नवी दिल्ली: वैद्यकीय उपचारांसाठी पाकिस्तानी महिलेला भारतात येण्यासाठी व्हिसा देण्याचे आदेश परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्ताला दिल्यानंतर संबंधित महिलेने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची स्तुती केली आहे. त्या पाकिस्तानच्या पंतप्रधान असत्या तर फारच चांगले झाले असते, असे पाकिस्तानी महिला हिजाब असिफ यांनी म्हटले आहे.

हिजाब असिफ या पाकिस्तानी महिलेने परराष्ट्रमंत्र्यांना वैद्यकीय उपचारांसाठी तत्काळ व्हिसा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबवाले यांना त्या संदर्भात आदेश दिले. सुषमा स्वराज यांनी दिलेल्या तत्काळ प्रतिसादाबद्दल असिफ म्हणाल्या, की खूप खूप प्रेम आणि सन्मान मिळाला. आपण आमच्या पंतप्रधान असता, तर संपूर्ण देश बदलून गेला असता.

स्वराज यांनी बंबवाले यांना ट्विट केल्यानंतर काही मिनिटांतच भारतीय मिशनने ट्विट केले, की ते अर्जदाराच्या संपर्कात आहेत. त्यात म्हटले आहे, की मॅम आम्ही अर्जदारांच्या संपर्कात आहोत. आम्ही निश्‍चितच त्याचा फॉलोअप घेत आहोत, असे ट्विट भारतीय उच्चायुक्तालयाने केले आहे. काही दिवसांपूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते, की पाकिस्तानातून भारतात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना अर्जाबरोबर पाकिस्तानचे उच्चायुक्त सरताज अजीझ यांच्या संमतीपत्राची आवश्‍यकता आहे.

इस्लामाबादमधील उपउच्चायुक्तालयात आपण चर्चा केली असून, रुग्णाच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे. आता आपल्यावर सर्व अवलंबून असून, तुम्ही जर परवानगी दिली तर, अशा आशयाचे ट्विट असिफ हिने काही दिवसांपूर्वी केले होते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी रुग्णाला व्हिसा मंजूर केल्यानंतर असिफ यांनी स्वराज यांचे कौतुक केले आहे. आपल्या ट्विटमध्ये असिफ यांनी म्हटले आहे, की मी आपल्याला काय म्हणू, सुपरवुमन. आपले आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. लव्ह यू मॅम.