पेट्रोल, डिझेलचे दर आणखी कमी

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

उत्पादन शुल्क कपातीचा स्थानिक करांवर परिणाम

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोन रुपयांची कपात केल्याचा परिणाम स्थानिक विक्री कर अथवा मूल्यवर्धित करावर झाल्याने इंधनदर कमी झाले आहेत. पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे प्रतिलिटर एकूण 2.5 रुपये व 2.25 रुपये कमी झाले आहेत.

दिल्लीत पेट्रोलचा दर आज प्रतिलिटर 70.88 रुपयांवरून 68.28 रुपयांवर आला. याचप्रमाणे डिझेलचा दर प्रतिलिटर 59.14 रुपयांवरून 56.89 वर आला. केंद्र सरकारने काल (मंगळवार) पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रतिलिटर दोन रुपयांनी कमी केले होते. सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे जनतेत निर्माण झालेला असंतोष कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले.

इंधन उत्पादन दरावर उत्पादन शुल्क आकारण्यात येते. उत्पादन दर अधिक उत्पादन शुल्क आणि वितरकांचे कमिशन या सर्वांवर मिळून स्थानिक कर अथवा मूल्यवर्धित कर आकारण्यात येतो. उत्पादन शुल्क कमी झाल्याने स्थानिक कर अथवा मूल्यवर्धित करही कमी झाला आहे. दिल्लीत काल पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर प्रतिलिटर 15.07 रुपये होता. तो आज 14.54 रुपयांवर आला आहे. तसेच दिल्लीत काल डिझेलवरील मूल्यवर्धित कर काल 8.73 रुपये होता, तो आज 8.41 रुपयांवर आला.