प्रियांका गांधी यांना डेंगीची लागण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

नवी दिल्लीः प्रियांका गांधी वद्रा यांना डेंगीची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने याबाबत शुक्रवारी माहिती दिली.

रुग्णालयाचे अध्यक्ष डी. एस. राणा म्हणाले की, प्रियांका गांधी यांना ताप आला होता. तपासणीत त्यांना डेंगीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी (ता.23) सायंकाळी त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. आता त्यांची प्रकृती सुधारत आहेत. दिल्लीत यंदा डेंगीच्या 657 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 325 रुग्ण दिल्लीतील व 332 अन्य राज्यांतील आहेत. दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातंर्गत डेंगीचे सर्वाधिक 64 रुग्ण आढळले आहेत.