प्रियांका वद्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा

वृत्तसंस्था
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : येथील एका खासगी रुग्णालयात प्रियांका वद्रा यांच्यावर डेंगीचे उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती आता सुधारू लागली आहे, असे रुग्णालयाच्या सूत्रांनी आज सांगितले. श्री गंगाराम रुग्णालयात त्यांना 23 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले आहे.

डॉ. अरूप बसू हे त्यांच्यावर उपचार करीत आहेत, असे चेस्ट वैद्यकीय विभागाच्या वरिष्ठ डॉक्‍टरांनी सांगितले. प्रियांका वद्रा यांना आता बरे वाटू लागले आहे. सध्या त्यांना ताप नसून महत्त्वपूर्ण पॅरामिटर आणि प्रयोगशाळांमधील चाचण्यांचे निकालांमध्ये त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे दिसत आहे, असे डॉ. डी. एस. राणा यांनी सांगितले. दिल्लीत 19 ऑगस्टपासून चिकनगुनिया, डेंगी आणि मलेरिया यांनी थैमान घातले असून त्यामुळे 657 जण आजारी पडले आहेत, असे महापालिकेच्या अहवालात म्हटले आहे.