संजय कोठारी नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जुलै 2017

नवी दिल्ली: "पब्लिक एंटरप्रायजेस सिलेक्‍शन बोर्डा'चे अध्यक्ष संजय कोठारी हे नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव असतील, तर ज्येष्ठ पत्रकार अशोक मलिक यांच्याकडे माध्यम सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नवी दिल्ली: "पब्लिक एंटरप्रायजेस सिलेक्‍शन बोर्डा'चे अध्यक्ष संजय कोठारी हे नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सचिव असतील, तर ज्येष्ठ पत्रकार अशोक मलिक यांच्याकडे माध्यम सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

वनसेवेतील गुजरात केडरचे ज्येष्ठ अधिकारी भारत लाल यांना संयुक्त सचिवपद नेमण्यात आले आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय समितीने पुढील दोन वर्षांसाठी या नियुक्‍त्यांना मान्यता दिली आहे. कोठारी हे 1978 च्या आयएएस बॅचचे हरियाना केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी राज्य आणि केंद्रीय पातळीवरदेखील विविध पदांवर काम केले आहे.

मुखर्जींनी केले लष्कराचे कौतुक
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तिन्ही सेना दलांच्या कामगिरीचे कौतुक करत हुतात्मा जवानांच्या त्याग आणि बलिदानास आदरांजली वाहिली आहे. सशस्त्र सेना दलांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभामध्ये बोलताना मुखर्जी यांनी सेनादलांचा प्रमुख या नात्याने लष्कराच्या भावी वाटचालीसाठीही शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी सायंकाळी या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री अरुण जेटली आणि तिन्ही सेनादलांचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: